Followers

Sunday 9 September 2018

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग

झाकतो उरातले दु:ख मी
चेह-यावरी रंग हसण्याचा.

पुरवून छंद वादळाचा रोज
चंग बांधतो मी जगण्याचा.

या जगाला जंग कसे म्हणू?
पाठीवरीच होतो वार त्यांचा.

करतात किती पुंग्या हरामी.
स्वार्थी हॊतो घास गाजरांचा.

गांडीखाली लपवून दिवा
बघा त्यांचा शोध उजेडाचा?
               परशुराम. सोंडगे,पाटोदा
              ९५२७४६०३५८

Sunday 2 September 2018

धुंदशी रात

रात धुंद


रात ओली धुंदशी
मंद जराशी..वारा.

गंधलेली रातराणी
का तू स्तब्ध जरा.
             परशुराम सोंडगे, पाटोदा
              ९५२७४६०३५८

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...