Followers

Friday 2 March 2018

रंग (कविता)

                            रंग




(रंगात रंगून गेलेल्या प्रियेची ही कविता) '


तुझे रंग माझ्यात
विरघळून गेलेत
जसे स्वच्छ पाण्यात
अलगद पांगत जावेत
रंग....


आता तुझे रंग कोणते नि
माझे रंग कोणते?
मला कुठं ओळखता येतात ?
तुझ्यात माझे विरघळलेले रंग

तू
नुसता पहात हासत
राहिलास..
तुझ्या चेह-यावर पांगत गेलेले
हासण्याचेते चावट रंग
तुला तरी कुठं लपवता आलेत ?

 माझ्यात मिसळलेले तुझे  रंग
अलिप्त करावं म्हटलं तर...
ते कुठं शक्य होतं?

अख्ख जाळावचं लागेल माझे मला
तेंव्हा कुठं
मी जळून जळून
गेल्यावर उरतील खाली रंग
माझ्या अस्तित्वाचे साक्षीदार...
म्हणून.....
त्यामुळे मी आता त्या फंदयातच नाही पडतं...!

नुसतं रंगात चिंब चिंब भिजत राहते.
आपण होऊनचं.
कायम रंगीतच राहते मी....
तुझे....रंग...काय नि माझे रंग काय
शेवटी रंगच ते.

तुला,  बघ तुझे रंग
ओळखता येतात का ?
माझ्यात विरघळलेले....
जाऊ दे ते...

ये,नुसतचं भिजत राहू रंगात.....
चिंब चिंब....

                         परशुराम सोंडगे,पाटोदा
                                    9673400928
                           

No comments:

Post a Comment

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...