Followers

Wednesday 7 March 2018

जाणीव










मी    
रस्त्यावरून चालताना असंख्य
आसुसलेल्या नजरा
खिळतात अंगभर
अन्
निरखला जातो माझ्या शरिराचा
एक अन् एक अवयव
जनावराच्या बाजारातल्या
मादीसारखा....
पारखून घेतलं जातं माझं चालणं
बोलणं...पहाणं
आणि हासणं सुध्दा....
अधाशपणे
किती किती अंकूचाव आपण
या चिवट आंबट
नजरापासून...
त्याच का होतात कायम विजयी ?
का असतो आपल्याच नजरेचा पराभव ठरलेला...
त्या नजरांचा होणारे स्पर्श
अनोख चैतन्य जागवून
गेला.
तेव्हा कुठं मला कळून
चूकलं होतं,की
त्या नजरा पौरूषी आहेत
आणि
मी एक स्त्री आहे.
माणूस नावाच्या प्राण्याची
एक मादी..
मी एक आई
प्रत्येक जीवाला जन्म
देणारी.....
    परशुराम  सोंडगे,पाटोदा
     9673400928

No comments:

Post a Comment

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...