Followers

Sunday 25 March 2018

त्यादिवशी……!!


त्यादिवशी……!!
तुझ्या  तशाचं माझ्या ही चटावलेल्या
डोळयांना एकमेंकाना भीडता आलं
नाही.
पावलांवर पावलं पडतं होती.
पण तुला अडखळता
अन
मला ही ओंलडता आलं नाही.
उरातलं सारचं ओठात आलेलं….
पण तुझ्या तशाचं माझ्या ही
शब्दांना नेहमीचं गददारपण सोडता
आलं नाही.
वारा आला.
तुझी ओढणी उडाली.
अन तुझं ते सुंदर लाजणं
तुला लपवता आणि मला पहाता
आलं नाही.
तुला तसचं मला ही माहीत होतं
पुन्हा कधीचं आपली भेट ही
होणार नाही.
तरी तू…….
जात होतीस अगदीचं  निशब्द……
मी हातांनी केलेला बाय
तुला पहाता अन्र मला थांबवता
आला नाही.
आता…..
तू…….
कीती दूर….
मला तुला, तुला मला भेटता
आलं नाही.
पण
शपथ, प्रिये अजून एक क्षण
विसरता आलं नाही.  
                  धन्यवाद…..!!






Wednesday 14 March 2018

सूर्य मी पेरतो आहे


कुणाला काही ही वाटो
मी सूर्य इथं पेरतो आहे.
फुलांच्या वर्दळीत असे
फक्त काटेच वेचतो आहे

कशास मारू उगी बाता
चांदणे मी नसात टोचतो
काळजाची नाही फिकरी
प्राण मी तळहाती झेलतो.

शपथ अंधाराची लढाई
मी एकटाच लढतो आहे
बघ ,वादळातही नव्याने
मी माझा इथं पेटतो आहे
 . . . . परशुराम सोंडगे.पाटोदा
 . . . . 9673400

Wednesday 7 March 2018

जाणीव










मी    
रस्त्यावरून चालताना असंख्य
आसुसलेल्या नजरा
खिळतात अंगभर
अन्
निरखला जातो माझ्या शरिराचा
एक अन् एक अवयव
जनावराच्या बाजारातल्या
मादीसारखा....
पारखून घेतलं जातं माझं चालणं
बोलणं...पहाणं
आणि हासणं सुध्दा....
अधाशपणे
किती किती अंकूचाव आपण
या चिवट आंबट
नजरापासून...
त्याच का होतात कायम विजयी ?
का असतो आपल्याच नजरेचा पराभव ठरलेला...
त्या नजरांचा होणारे स्पर्श
अनोख चैतन्य जागवून
गेला.
तेव्हा कुठं मला कळून
चूकलं होतं,की
त्या नजरा पौरूषी आहेत
आणि
मी एक स्त्री आहे.
माणूस नावाच्या प्राण्याची
एक मादी..
मी एक आई
प्रत्येक जीवाला जन्म
देणारी.....
    परशुराम  सोंडगे,पाटोदा
     9673400928

Tuesday 6 March 2018

तुझे रंग,तुझे गंध







  • तुझे रंग तुझेच गंध 
  • फुलास  जाळतात
  • अभाळाच्या  कळा
  • तुझे शब्द पाळतात.

  • तुझे हासणे लाजणे
  • काळजाला चिरतात
  • चांदण्याचे हे उसासे
  • तुझेच स्वर छेडतात

  • तुझे बहर तुझे कहर
  • सदा शिवारी पांगतात
  • झ-याची झुळझुळ ही
  • तुझे ते इरादे सांगतात?

  •  . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
  •  . . . . . . 9673400928

पुसून कशी घ्यावी लाली

Sunday 4 March 2018

विरघळून मिठ्ठीत तुझ्या




   ओल काळजाची माझ्या रे

    तुझ्या काळजाला भिडावी.

    विरघळून मी मिठीत तुझ्या

    माझी मीच न थोडी उरावी

                           परशुराम सोंडगे, पाटोदा
                            ९५२६४६०३५८

Friday 2 March 2018

प्रेम जळण असेल ....?


तो आला
हासत हासत आणि अधाशपणे
घेतलं ओढून कुशीत मला
पण
मी तटस्थ पणे जळत राहीले
त्या उसळलेल्या वासना आगीत
मी शोधत राहीले
ह्रदयातून पाझराने ते प्रेमाचे
थेंब
शपथ !
मी अनुभवला फक्त  जाळ
तुझ्या
कुशीत मी शिरले की तुझं ह्रदय
असं थेंबा थेंबानं पाझरत राहयंच
आणि
त्याची नदी होत जाई
मी वाहत जाई
अगदी भौतिक वस्तू सारखी
जळणं असेल
नाही तर  वाहणं असेल
लोक  त्यालाच
प्रेम म्हणतात
 . . . . परशुराम सोंडगे. पाटोदा
 . . . . 9673400928
prshuramsondge.blogspot. com

रंग (कविता)

                            रंग




(रंगात रंगून गेलेल्या प्रियेची ही कविता) '

Thursday 1 March 2018

तुझे चांदण पाऊल


गंधाळली रात्र


 गंधाळली रात्र.     
                                
गंधाळली रात
मंद जरा वारा

मिठ्ठीत ग तू इथे            
तू धूंदलेली जरा

झुरे चंद्र नभात ग
रातराणी बावरली

दवात चिंबलेली
कळी ही मौनातून
               परशुराम सोंडग

तू पहाट ओली


    तू पहाट ओली


सांज कोवळी येते का?
गंध अाठवांचा  घेऊन

उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून.

पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा.

ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा.

झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली.

विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली.
                    परशुराम, सोंडगे, पाटोदा
                     ९५२७४६०३५८
                      prshuramsondge.blogspot.com


जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...